Tuesday, January 17, 2012

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही.

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही.

आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही. माझा विरोध आहे तो मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपले पाककला नैपुण्य दाखवणाऱ्या स्त्रियांना... (या वर्गात शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांपासून कवळी वापरणाऱ्या शि. सा. न. आज्जींपर्यंत सगळा महिलावर्ग मोडतो). अजून मुद्दा लक्षात आला नाही वाटतं... थांबा. माझ्यावर ओढवलेला एक (बाका) प्रसंग सांगतो. (इथे अति-प्रसंग असं म्हणायची माझी फार इच्छा होती.. अहो तो प्रसंगच होता तसा... पण असो.)

दिवस: मकर संक्रांत

वर्ष: तितकंसं महत्वाचं नाहीये ते.

वेळ: सणासुदीचं काहीतरी छान छान खायच्या इच्छेने पोटात कावळे कोकलतात ती.

स्थळ: (कृपया या शब्दाचा अर्थ 'ठिकाण' असा घ्यावा. लग्नाळू व्यक्तींनी अर्थाचा अनर्थ करू नये) पुण्यातील असेच एक (बहुदा सदाशिव पेठी ) जोशी - कुलकर्णी घर.

माझं त्या घरातल्या काकांकडे काम होतं आणि ते मात्र नेहेमीप्रमाणे "अरे फक्त दहा मिनिटांत आलो" असं म्हणून साधारण एक तासभर त्यांच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये भांडत बसले होते. त्यांची वाट बघत बघत मी आपला टीव्हीवर चाललेला " क्या मंगलवासी अभिषेक-ऐश्वर्या कि बेटी का अपहरण करना चाहते है" हा अतिशय अभ्यासपूर्ण कार्यक्रम बघत होतो. मंगळावरचे लोक प्रचंड निरुद्योगी असावेत असं काहीतरी त्या कार्यक्रमामधून वाटत होतं. राखी सावंत या गोष्टीवर आपलं बहुमोल मत मांडायला टीव्हीवर आली आणि नेमकी तेव्हाच स्वयंपाकघरातून हाक आली, "अरे हे येतीलच हं इतक्यात.. मीटिंग जरा लांबलेली दिसतेय. एकटाच बाहेर बसून कंटाळला असशील ना... आत ये की. माझ्याशी जरा गप्पा मारल्यास तर चालेल की..." मनापासून सांगतो... मला त्या राखी सावंत आणि मंगळवाले लोक यांना सोडून जायचं जीवावर आलेलं, पण काकुंशी गप्पा मारताना काहीतरी खायला मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे आमची स्वारी थेट स्वयंपाकघरात...

या काकूंची 'पियू' (शारीरिक वय अंदाजे १७ वर्षे आणि बौद्धिक वय अंदाजे ५ वर्षे.. अर्थात हे आमचं वैयक्तिक मत. शाळेत दरवर्षी पहिला नंबर येत असल्यामुळे या बाईसाहेब लौकिकार्थाने हुशार आहेत पण तशा डोक्याने ‘मठ्ठंच’ आहेत)... तर या बाईसाहेब स्वयंपाकघरातंच ग्यासवर काहीतरी करत होत्या. माझी धडकी भरली. ‘खायला नको पण या पियूच्या स्वयंपाकाला आवर’ अशी तिची पंचक्रोशीत ख्याती होती. कोल्हापुरी मिसळीपासून नागपूरच्या वडाभातापर्यंत सगळे पदार्थ या बाईसाहेबांनी करून समस्त घरच्या आणि फुकटचं खायला म्हणून आलेल्या पाहुणे मंडळींची पोटं पार बिघडवली होती. पियू तयार करत असलेली ती स्पेशल 'डीश' तयार व्हायच्या आत काका यावेत अशी मी मनोमन प्रार्थना चालू केली. काका येईपर्यंत खिंड लढवणे आणि काहीही झालं तरी पियूच्या स्वयंपाकाचा विषय टाळणे हा एकमेव मार्ग मला दिसत होता. तेवढ्यात काकूंनी गुगली टाकला,"काय रे वधूसंशोधन कसं चाललंय? अरे त्या भावेंच्या चुलतबहिणीच्या मावसनणंदेच्या चुलत सासऱ्यांच्या नातीचं स्थळ आलेलं ना तुला सांगून... काय झालं रे त्या स्थळाचं?" अतिशय अवघड प्रश्न. आता ही भावेंची नातेवाईक मुलगी माझा 'अतिसुंदर' फोटो बघून मला थंड नकार देऊन गेली. आता मला त्या पोरीने रीजेक्ट केलं, हे मला सांगायचं नव्हतं; काही झालं तरी माझ्या इमेजचा प्रश्न होता. आता अजूनही मी हातात लग्नाची पत्रिका किंवा साखरपुड्याचं आमंत्रण घेऊन उभा नाहीये ह्याचा अर्थ काहीतरी बोम्बल्लेलं आहे असा होत नाही का; मग असे अवघड प्रश्न कशाला विचारतात देव जाणे...असो.

"बापरे... अहो काकू मुंबईमध्ये जाळपोळ झाली म्हणे कुठेतरी..." मी माझ्या मोबाईलची स्क्रीन बघत एक एसएमएस वाचायचं नाटक केलं. आता ह्याला अफवा पसरवणे म्हणत नाहीत. फक्त आपल्या आयुष्यातील एका खाजगी विषयावर होऊ घातलेली जाहीर चर्चा टाळण्याचा हा एक प्रामाणिक उपाय होता... आता मुंबईमध्ये रोज कुठे ना कुठे मोर्चा, मारामाऱ्या, जाळपोळ हे प्रकार होताच असतात त्यामुळे काकूंना ते खरं वाटलं असावं कारण त्यांनी पण लगेच "आजकाल काही खरं नाही हो या लोकांचं... उठतात आणि मारामाऱ्या करत सुटतात.. बघ ई टीव्ही वर बातम्या लागल्या असतील. त्यात सांगतील” असं म्हणत 'आजकालची बिघडलेली तरुण पिढी' हा महाबोर असा 'प्रवीण दवणे फेव्हरेट' विषय चालू केला. मी शांतपणे टीव्हीवर परत एकदा राखी सावंतची मुलाखत चालू केली. नको तो विषय संपवल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला लागलाच होता.... पण खरं सांगतो नियतीला आमच्या आयुष्यात सुख बघवत नाही हो..

पियू शांतपणे गजगामिनीसारखी पदन्यास करत (म्हणजे आपला ८० किलोचा अवाढव्य देह सांभाळत हत्तीणीसारखी झुलत झुलत) माझ्या समोर उभी राहिली. तिच्या हातात एक ताटली आणि त्यात ४-५ काळेकुट्ट छोटे गोळे होते. "दादा, अरे मी ना आज संक्रांत म्हणून तीळगुळाचे लाडू केलेत. चव घेऊन बघ की कसे झालेत ते." आली का पंचाईत!!! मी अविवाहित असल्यामुळे 'फुकट ते पौष्टिक' हा माझा ध्येयवाद होता पण फुकट असलं तरी पियूच्या हातचं काहीही खायचं नाही हा आमच्या गल्लीतल्या मंडळींनी (अर्थात गुपचूप) पास केलेला ठराव मोडण्याचं धाडस मला काही होईना. आमचा देव पण ना असा नको तिथे परीक्षा पाहण्यात एक नंबर! फाशी जाणाऱ्या कैद्याने आपली शेवटच्या जेवणाची थाळी हातात घ्यावी त्या उत्साहाने मी ती ताटली हातात घेतली आणि समोर राखीच्या मुलाखतीत लक्ष केंद्रित केलं. पियू आतल्या खोलीत गेली की ते लाडू गुपचूप खिशात घालायचे आणि बाहेर पडल्यावर त्याची योग्य ती वासलात लावायची असा माझा बेत होता. पण ठरवलेलं होईल तर ते आमचं नशीब कसलं... पियू समोरच उभी राहिली. "अरे दादा खा ना. चव कशी आहे ते सांग म्हणजे जर काही बिघडलं असेल तर मला दुरुस्त्या करायला बरं!!!"

"गधडे, कार्टे मी काय प्रयोगशाळेतला उंदीर आहे माझ्यावर हे असे प्रयोग करायला?" असा म्हणायची खर्रच खूप इच्छा झाली होती हो... पण काय 'दादा-धर्माला' जागणं आलं आणि मी शांतपणे एक काळा गोळा तोंडात घातला. तो चक्क कडू होता. ‘संक्रांतीला गोड गोड तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा संदेश देताना हा कडूजार तिळगुळ या बयेने मला का द्यावा? मी कडू बोलावं अशी हिची अपेक्षा आहे का?’, असा विचार मी करत होतो आणि पियू म्हणाली, "अरे दादा, बाबांना डायबिटीस आहे ना म्हणून लाडवांमध्ये गुळापेक्षा जास्त मेथी घातलीये म्हणजे त्यांनापण खाता येतील." "अगं मंद झम्पे... डायबिटीस तुझ्या बापाला आहे मला नाही.. हे जीभेपर्यंत आलेले शब्द मी शांतपणे गिळून टाकले." पण तोवर त्या कडू चवीमुळे माझ्या डोक्यात तिचा 'बाप' काढण्याइतपत राग निर्माण झालेला होता.

मग मी तो लाडू चावायचा निष्फळ प्रयत्न केला. माझ्या रूट कॅनल केलेल्या एक-एक दातातून अतिशय जीवघेणी कळ गेली, १-२ दात त्या गोळ्याला आपटले ( कदाचित आपटून फुटले पण असतील ) पण तो गोळा काही तुटेना. "थोडेसे कडक झालेत लाडू. तेवढाच दातांना जरा व्यायाम", असं म्हणून ती मूर्खीण हसली. "थांब तुझ्यासाठी पाणी आणते", असं म्हणून आत गेली. "पाणी नको. हे गोळे खायच्या ऐवजी विष आण" असं म्हणायचं माझ्या अगदी जिभेवर आलं होतं... पण शेवटी १-१०० आकडे मोजले आणि थांबलो. ती आत जाऊन येईपर्यंत शांतपणे तोंडातला गोळा बाहेर काढला आणि खिडकीतून बाहेर भिरकावून दिला. मग मी ताटलीतले बाकीचे गोळे पण असेच बाहेर भिरकावून दिले आणि रिकाम्या तोंडाने काहीतरी चघळत असल्याची अक्टिंग करत बसलो.

"काकू, छानच झालेत हं लाडू... काही म्हणा पण पियूच्या हाताला (वाईट्ट कडू) चव आहे बुवा. या वयात एवढं एक्सपरटाईज म्हणजे कमाल झाली हो", मी तोंडातली ती घाणेरडी कडू चव विसरत आपलं कसं बसं बोललो. "छे रे दादा, तुझा आपलं काहीतरीच!!!", "हो. खरंच. माझा आपलं काहीतरीच", हे अर्थात मी मनाशी! पियू आत लाजली असावी कारण बाहेर येताना ती आणखी एक छोटा डबा घेऊन आली आणि म्हणाली,"तुला एवढे आवडतील असं वाटलं नव्हतं रे. हे घे. डब्यात आणखी दिलेत. तालिबानी अतिरेक्यांना बॉम्ब हातात देताना जसं वाटेल ना तसं काहीतरी मला वाटलं. तेवढ्यात "हरामखोर लेकाचे. अक्कल नाही इथे कुणाला. सुशिक्षित म्हणवतात स्वतःला पण एकही लेकाचा सुसंस्कारित नाही. घरातून दगड धोंडे फेकले माझ्यावर.. अर्रे बघून घेईन एकेकाला...", असं म्हणत काकांनी एन्ट्री घेतली.

"काय झालं काका? असे चिडलात का हो एकदम?", मी विचारलं.

"अरे मी आत्ता खालून येत होतो आणि कोणीतरी माझ्यावर दगड फेकले रे... अर्रे मर्द मराठ्याची औलाद असेल तर समोर ये म्हणावं...लपून छपून कसले वार करता... हे बघ चांगले ४ दगड मारले रे..." काकांनी मूठ उघडून त्यांना लागलेले ते ४ 'दगड-धोंडे' दाखवले... "एकाचा नेम चुकला..." मी मनाशी हिशोब लावत स्वगत म्हटलं...

"आलात का... अहो किती वेळ. हा बिचारा तुमची वाट बघून बघून कंटाळला अगदी. अरे.. हे काय अहो ते लाडू याच्यासाठी दिले होते पियूनं... तुम्ही काय उचललेत सगळेच्या सगळे... अधाशीच बाई मुलखाचे तुम्ही. हादडा आता. तू थांब रे. तुझ्यासाठी आतून आणून देते लाडू." काकूंनी जवळपास हिरोशिमा नागासाकीवाला बॉम्बच टाकला.

काका अजूनही टीव्हीवरच्या संस्कृत बातम्या बघताना होतो तसा चेहेरा करून एकदा माझ्याकडे, एकदा काकूंकडे आणि एकदा त्या हातातल्या ४ लाडू कम दगडांकडे बघत होते. त्यांचं ते प्रश्नचिन्ह आणखी गडद होण्याआधी मी तिथून चक्क पळून गेलो. आजतागायत त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत. पियू मला बघितलं की नाक फेंदारून निघून जाते आणि काकू त्यांच्या ओळखीतल्या कोणालाही माझं स्थळ सुचवत नाहीत. सुदैवाने काका मला अजून दिसलेले नाहीत. आता मला सांगा या पूर्ण प्रकरणात माझी काहीतरी चूक होती का? पण भोगतोय कोण? असो.

असो. तर त्या दिवसापासून मला मकर संक्रांत आवडत नाही...

जाता जाता सहज सुचलं म्हणून विचारतो ... या पियू सारख्या लोकांचा निषेध करायला म्हणून संक्रांतीला काळे कपडे घालतात का हो?

-निरंजन खांडेकर

Monday, July 27, 2009

The muddy water

The muddy water

He stood on the bridge. The river down flew slowly... it had no hurry to reach to the sea. For a moment he kept on looking at the water. A small pink rose came flowing along... he just gazed once at the flower. Being on a high bridge it was not possible for him to pick it up but then he would have hardly picked it up even if he would have got a chance to... it was the thing he now detested the most. The flower lover’s bouquet of love had now got converted into a bin of hatred... The flowers had probably wilted...

He still remembered the day when she had given him the pink rose on the rose day. It was the first rose he had ever got. She was a nice girl and in looks, she could be classified as pretty. He had never even dreamt that a girl would be giving a rose to him and when a girl like her gave him a pink rose, he was about to get a heart attack... but again he had controlled himself. He had felt it to be a prank and had denied the rose. He was probably the only guy who had actually denied the first ever pink rose of his life.... but then probably it was worth rather than being laughed at later because of a prank... Later she had convinced him that she really had some feelings for him and then he had accepted the rose was a different thing altogether but he still believed his denial for the rose was indeed one of the wisest things he had ever done...

A girl offering a hand of friendship, a rose, asking out for a date.... all this was very much new for him. He had never dealt with things like love or affair or to say in better words, something known as relationship or so; but this feeling had been amazing. Waiting for someone to call, waiting for some special sms, and special pings on the messengers.... it all felt nice to him. Somehow slowly he had started liking this experience. His life was transformed completely. His lifestyle had changed. He had started spending time on makeup to look better. He had started buying gifts. He had started to daydream... all this had happened in just a few months...

He now remembered every day... it was so clear as if some movie was being played in front of him. He still remembered the day when they had gone out for their first date... a romantic dinner in a restaurant on a beach. He had never experienced the magic of the candle light dinner before. The cool sea breeze flew past them making her hair float momentarily, making her look like a princess. But he somehow had not been able to tell her all that that day... It was her who had asked him out and he had felt really awkward while dining with her, while dancing with her and even sharing a single ice cream.... Gradually he had got accustomed to all those things... They had started going to such dates regularly and he had actually started feeling something special for her...

But somehow things hadn’t been so smooth recently as they were in past... probably she had started liking someone else more and that’s what he couldn’t stand... he had called her for a small meeting and had opened up his heart and that’s where everything had gone wrong... a shocking truth had got revealed and it had looked as if he had made a fool of himself...

Apparently she had no feelings for him and whatever she had done with him was just to keep a drunkard guy away from her by showing him a bodyguard around her. All those dates, the roses, the gifts were just to enjoy the free evenings and to keep the unwanted guys away. She had just portrayed everything.... it was all fake... she hadn’t felt anything the way he had. It was just an acting... brilliant acting that had fooled almost the whole college. And now, he was being neglected or to say left alone to his own fate just because she had got a new guy.

He had always preferred study as his best friend. He had preferred staying away from girls and then he had changed; thanks to her... and now she preferred to stay away from him. It was bad...no it was unfortunate for him... the cocoon had evolved into a butterfly; just to realize the flower that he had longed for and got converted from the cocoon, was no more his...

All those memories surfaced as he kept on looking at the slow river water. It looked nice but again the very next moment he felt as if the muddy water of the river was hiding something beneath. The colour of the mud didn’t allow him to see anything below the surface. Who knew what all things the seemingly slow muddy water had hid beneath it? And he hated it... he hated all that, he hated all those who hid something and portrayed something else. He wondered why people could not remain honest. He went off to see what the river had hid beneath it...

Her cell kept ringing as the police redialled the last number to identify the body... but the noise in the disc was too high for her to make out the ringing of her cell... it kept on ringing for a while; probably she was so busy in the new guy that she didn’t have any time to spend even for her old friend’s or convenience-crush’s dead body’s identification....

-Niru

Friday, May 29, 2009

The best b’day!

The best b’day!

 

Oh ...  it was 6th June... My b’day ... I didn’t even realise. I had actually lost the notion of time, days and dates after coming here... not that life was hectic or I was not getting time to have a look at the calendar but then there were not many incidents when I actually looked into the calendar to ponder upon the dates and probably I avoided the same for the very reason that it reminded me of some days...

                Today was different altogether... When I opened my eyes in the morning, the whole room was decorated with colour papers, shining plastics, balloons and what not. It felt like a year old baby’s b’day getting celebrated. It was so nice and on the top of that, all of them stood encircling me, smiling and waiting for me to crack some joke or so. It was such a nice surprise! I had not even dreamt about this... All of my friends; they had come to celebrate my b’day taking out time from their busy schedules... It felt nice... I remembered our college days and b’day celebrations there... all those amazing memories of my life got freshened up... They all were there.... my roommate with whom I shared my feelings, studied hard... all my friends in my group with whom I enjoyed the best days of my life... and even she was there.... my crush... somehow things had not turned in my favour and I had preferred keeping my feelings to myself... now I realised the game of the luck... it turned out to be in her favour afterall she would get a life-long partner for her...

                Someone kept a laptop on my lap and then started a video – my b’day video... it was our tradition in college to make a b’day video for the b’day boy or the b’day girl using whatever wackiest pics clicked and using some simple movie maker software or so. Probably that was the only thing where everyone employed the maximum of their creativity. The video was really nice; right from my friends in school, they had put in every other girl’s pic in it portraying me as a complete flirt guy. The songs in the background actually made the effect even worse. It was actually embarrassing to see that in front of my mom n dad but again the way niru was portrayed in it was not important but the love and the affection my friends showed towards me in making the video...

                The next event we used to do was to hold the b’day boy and spank him like anything. Whatever anger, frustration anyone had that day would take it down over the b’day boy’s backside. Today somehow they were not in mood of spanking me.... they just brought a cake... a big chocolate cake with the liquid chocolate all over it... I felt like finishing it off all by alone the way it was tempting... Then there were usual fights over putting the number of candles when some of my useless friends persisted on lighting only single candle representing my true brain age.... We had to listen to him... afterall it was simpler to blow single candle on the cake... I had to make some wish before blowing the candles and I did. Just wanted to check whether such wishes come true...

                The cake was really sweet whether it felt so because of the chocolate all over it or the love my friends showed towards me... I really don’t know. Chatting with dear friends after so many days and that too for so much time was so amazing. It was Sunday that’s what they told me later, and probably that’s why no one as such was in a hurry to leave for the office or so... What else a person wants in his life? My friends had made that day special... they had coloured and energized those white and green walls of the hospital...

In the evening when they all left, I felt like thanking them by hugging them tight for making my b’day so special... But cancer had made my body so weak that it wasn’t possible for me to even get up from the bed...

That was my last day... I didn’t even see the midnight... My death was not unexpected; in fact it was very much expected or to put it into right words I was waiting for the once for all freedom from the sufferings but what mattered there was the way all my friends made my last day special... when they celebrated my b’day much before 6th June and when even the day was not a Sunday.... they all portrayed it so... Afterall spending a day with your close sweetheart friends is nowhere lesser than a real b’day isn’t it? While blowing the candles on my cake, the only wish I had made to god was to keep the memories of that special day fresh forever... My death made it sure they remain like that before any new incidents overwrite them... In my case at least, the wishes on the b’day candles had come true!

-Niru